जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचार्यांना निवृत्तीवेतन लवकर अदा करण्याची मागणी
शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांना गेले तीन महिने अनियमित वेतन देण्यात येत आहे. जि.प. च्या हजारो निवृत्त कर्मचार्यांना तीन महिने वेतन वेळेवर मिळाले नसल्याने वयोवृद्धांची अत्यंत हालअपेष्टा होत आहे. एप्रिलचे निवृत्ती वेतन उशीरा तर मे महिन्याचे मिळालेले नाही. ही जीवघेणी संपवून निवृत्ती वेतन धारकांना वेळेवर नियमित सेवानिवृत्ती वेतन शासनाने द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोकण विभाग शिक्षण सेल अध्यक्ष समन्वयक ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.
www.konkantoday.com