
चीन कंपन्यांचे करार रद्द केलेले नव्हते, ते जैसे थे ठेवले होते- उद्योगमंत्री सुभाष देसाई
चीन कंपन्यांचे करार रद्द केलेले नव्हते, ते जैसे थे ठेवले होते, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, चीनबरोबर जे संबंध आहेत ते सुधारत असल्याची माहिती आजच आम्हाला मिळाली. त्यामुळे चीन कंपन्यांबरोबर झालेल्या करारांना अडथळा येणार नाही. चीनच्या कंपन्यांबरोबर झालेल्या करारांबाबत केंद्र सरकारने आम्हाला थांबू नका, असे सांगितले नाही. आता परिस्थिती सुधारत असल्याने काही अडचण येईल असे वाटत नाही, असे देसाई म्हणाले.
www.konkantoday.com