
इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग
देशभरात आज (बुधवार) पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात १७ पैसे ते २० पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर ७७.४९ रुपये इतका झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे. देशातील ही पहिलीच घटना आहेआजच्या दरवाढीनुसार, देशातील महानगरांमधील दरवाढ अशी. दिल्ली (पेट्रोल – ७९.७६, डिझेल -७९.८८), मुंबई (पेट्रोल – ८६.५४, डिझेल-७७.७६), चेन्नई (पेट्रोल – ८३.०४, डिझेल-७६.७७), कोलकाता (पेट्रोल – ८१.४५, डिझेल-७४.६३) इंधनाचा दर आहे.
www.konkantoday.com