वादळग्रस्त नागरिकांना मदत करण्यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीतच चांगली जुंपली
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा या तीन तालुक्यांमुळे प्रचंड नुकसान झालं आहे या भागातील वादळग्रस्त नागरिकांना मदत करण्यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीतच चांगली जुंपली असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘पालकमंत्री अदिती तटकरे शासनाकडून आलेली सर्व मदत नागरिकांना पोहोचवत नसून फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देतात’, असा आरोप अनिल नवगणे यांनी केला.
www.konkantoday.com