जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शिरगाव ता. रत्नागिरी येथील पुरुष रुग्णाला (वय 65) किडनी व मधुमेहाचा आजार होता तसेच काडवली संगमेश्वर येथील महिला रुग्ण (वय 42) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे आज कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 2 रुग्णांना तर जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 2 रुग्ण असे एकूण *4* रुग्णांना *बरे* झाल्याने घरी सोडण्यात आले.
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -484
बरे झालेले रुग्ण -353
मृत्यू-21
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-111 (यामध्ये 01 रुग्ण पुन्हा दाखल)
www.konkantoday.com