
दापोलीत झाडे तोडण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतींना ३५ वूडकटर मशिन दिले
निसर्ग चक्रीवादळाने दापोली तालुक्यात अनेक घरांवर पडलेली झाडे दूर करण्यासाठी प्रशासनाने सर्वाधिक बाधित ग्रामपंचायतींना ३५ वूडकटर मशिन विकत घेवून दिले आहेत.
या चक्रीवादळात दापोली तालुक्यात ९९७ घरांचे पूर्णपणे तर १८ हजार ८०८ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. यातील बहुतांश घरांवरील पत्रे उडून गेल्याने भिंतींचे भिजून नुकसान झाले आहे. केळशी, पाडले, आडे, उटंबर, पाजपंढरी व हर्णै गावातील घरांची जास्त पडझड झाली आहे. सुरूवातीला प्रशासनाने प्रत्येक मंडल अधिकार्याला वुडकटर खरेदी करून पुरविले. या कटरच्या सहाय्याने रस्ते मोकळे करण्यावर भर दिला गेला. आता घरांवर पडलेली झाडे दूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावामध्ये कटर उपलब्ध नसल्याने व गावात कोणीही मजूर काम करायला मिळत नसल्याने अनेक ग्रामस्थांनी घरावर पडलेली झाडे दूर करण्यासाठी प्रशासनाकडे साकडे घातले आहे. प्रशासनाने ३५ वूडकटरची खरेदी करून ते बाधित ग्रामपंचायतींच्या ताब्यात दिले आहेत.
www.konkantoday.com