चिनी मालाची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकार आता नवे ई- कॉमर्स धोरण अवलंबिवणार
भारतीय बाजारपेठेतील चिनी मालाची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकार आता नवे ई- कॉमर्स धोरण अंगीकारणार आहे. ई- कॉमर्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून वस्तूंची विक्री करण्यापूर्वी संबंधित वस्तू ही भारतात तयार झालेली आहे किंवा नाही, हे स्पष्टपणे सांगावे लागेल
या नव्या उद्योग धोरणाचा मसुदा वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयाकडून तयार केला जात असून यामध्ये देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे चिनी वस्तूंवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल असा अंदाज आहे.
www.konkantoday.com