
महाराष्ट्रातील कोणतेही उद्योग इतर राज्यात जाऊ देणार नाही उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे
महाराष्ट्रातील कोणतेही उद्योग इतर राज्यात जाऊ देणार नाही . स्थानिकांना प्रदूषण करणाऱ्या कंपन्या नको असतील तर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल , अशी ग्वाही उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली .
उद्योग – सेवा क्षेत्रात नवी उभारी घेण्यासाठी राज्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे दुसरे पर्व सुरू होत आहे . कोरोनामुळे उद्योग व्यवसायाला आलेली मरगळ दूर करणे आणि रोजगार उत्पादनासाठी सरकारने 12 सामंजस्य करार केले आहेत.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये केमिकल उद्योगांना स्थानिकांचा विरोध आहे . त्यामुळे काही कंपन्या गुजरातसह इतर राज्यात स्थलांतरित होत आहेत . या विषयावर तटकरे म्हणाल्या , स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही कोणतीही रासायनिक कंपनी आणणार नाही . मात्र इतर समस्या असतील तर एमआयडीसीचे अधिकारी स्थानिकांशी चर्चा करून त्यांचे समाधान करतील . त्यांनी तत्काळ कारखाने सुरू करा अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये कोकाकोला आणि रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना सुरू होणार आहे . मत्स्य प्रकिया प्रकल्पही थोड्या दिवसात सुरू होईल . प्रदूषण विरहित कारखाने येथे आणले जातील . त्याशिवाय ज्यांनी भूखंड घेतले आहेत त्यांनी तत्काळ कारखाने सुरू करून रोजगार उपलब्ध करावा . यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले .
www.konkantoday.com