आमची कोणतीही नाराजी नव्हती-बाळासाहेब थोरात
महाविकासआघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.
‘राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकासआघाडी भक्कम आहे आणि ५ वर्ष चांगलं काम करेल,’ असं बाळासाहेब थोरात या बैठकीनंतर म्हणाले.
www.konkantoday.com