अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोविड योद्ध्या रंजना कदम यांचेवर शस्त्रक्रिया,सध्या प्रकृती स्थिर
गेल्या तीन महिन्यांपासून संगमेश्वर तालुक्यातील विलगीकरण कक्षात कोविड योद्ध्या म्हणून अहोरात्र कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका श्रीमती रंजना कदम या अपघातात गंभीर जखमी झाल्या हाेत्या. डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर दोन तासांची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर श्रीमती कदम यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणार्या डॉक्टरांनी सागितले.
सुट्टीनिमित्ताने श्रीमती रंजना कदम फणसोप गावी गेल्या होत्या. फणसोपहून त्या नेहा शिंदे यांच्याबरोबर स्कूटरने रत्नागिरी शहरात जाताना त्या भाट्ये खाडीपुलाजवळ फोटो काढण्यासाठी थांबल्या होत्या. त्या पुलाच्या बाजूला असलेल्या पादचार्यांसाठी असलेल्या मार्गावर उभ्या असताना एका भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या पादचारी मार्गावरच पडल्या. त्यांच्या डोक्याला, हातापायाला, चेहर्याला गंभीर दुखापती झाल्या. त्यांना त्यानंतर रूग्णालयात हलविण्यात आले होते. अपघात झाल्यानंतर वाहनचालक तेथे न थांबता निघून गेला होता. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्हीच्या फुटेजमधून टेंपोचा चालक राजेश मुरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
www.konkantoday.com