मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चे विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६०३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील उद्योगक्षेत्राची घडी विस्कटली असतानाच महाराष्ट्राच्यादृष्टीने एक आश्वासक गोष्ट सोमवारी घडली. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६०३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्र्यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
www.konkantoday.com