
चिपळुणातील नाल्याच्या कामात बदल केल्याने गोवळकोटवासियांनी काम रोखले
चिपळूण शहरातील गोवळकोट रोड येथील पुर्वनियोजित असलेल्या नाल्याच्या कामात अचानक बदल करून विरूद्ध दिशेने वळवण्याचा खटाटोप न.प.कडून करण्यात आला. या कामाला गोवळकोटवासियांनी विरोध करत हे काम बंद पाडले. तसेच गोळकोट चर येथे नदी पात्रात नाल्याचे पाणी सोडू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून गोवळकोट राड येथील नाल्याचा प्रश्न वादग्रस्त बनला आहे. नवीन बांधकामामुळे पूर्वीचा नैसर्गिक नाला अस्तित्वात राहिलेला नाही. परिणामी या भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी तुडुंब राहत आहे. त्यातून या भागात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाययोजना करण्यात यावी अशी येथील रहिवाशांकडून मागणी केली जात आहे.
www.konkantoday.com