
महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून आज १२ मोठ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून १२ मोठ्या सामंजस्य करारांवर आज म्हणजे सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होणार आहेत. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई , उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचीही उपस्थिती राहील. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.
www.konkantoday.com