सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आता कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे लक्षणे नसलेले आणि कमी प्रमाणात लक्षणे असलेल्या रूग्णांना ठेवण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये ग्रामीण रूग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी किंवा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com