
हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो,भाजपा नेते अतुल भातखळकर
महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला काही महत्व आहे की नाही, निर्णय प्रक्रियेत पक्षाला स्थान कुठे आहे, पक्षाची ध्येय-धोरणे बेदखल होत आहेत, अशा अनेक मुद्यांवर गुरुवारी काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटला. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या कार्यपद्धतीवर सर्वच मंत्र्यांनी नापसंती व्यक्त करीत, त्यांच्या प्रस्तावित मुदतवाढीला अप्रत्यक्ष विरोध केल्याची माहिती समोर आली होती. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“हेही राजकारण आहे का मुख्यमंत्री महोदय? हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो.,” असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा बाण सोडला
www.konkantoday.com