
रत्नागिरी आर्मी ची टीम दापोलीला मदतीसाठी रवाना शनिवार रविवार दोन दिवस मदतकार्य
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांचे संकल्पनेतून साकारलेली रत्नागिरी आर्मी ची पहिली टीम निसर्ग चक्री वादळामुळे दापोली मंडणगड तालुक्यात प्रचंड नुकसान झालेले आहे.
दापोली येथील आंजर्ले येथील पाडले गावात श्रमदान करणे साठी आज सकाळी 7 रवाना झाली या मध्ये रत्नागिरी आर्मी चे 50 सैनिक सहभागी झाले आहेत सोबत पोलीस प्रशासन ची टीम सोबत रवाना झालेली आहे *अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक प्रवीण पाटील , उपअधीक्षक गणेश इंगळे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील मार्गदर्शनाखाली सर्व टीम काम करणार आहे रत्नागिरी आर्मी ने पुढील सर्व साहित्य सोबत घेतले आहे पडलेली झाडे कट करण्याचे मशिन्सकटर 5, जनरेटर 5, इलेक्ट्रिक वायर बोर्ड,दोरखंड 10, हॅलोजन,कोयत्या10, कुऱ्हाड10 फावडे20,घमेले 20,खुरापणी 20 प्रथमोपचार किट, इंडस्ट्रीयल हँगलोज 100, सॅनिटायझर15 लिटर , हॅन्डवॉश 5, मास्क 500, जेसीबी 1, ट्रॅक्टर इत्यादी सामानासाहित रवाना झाली
सोबत तेथील आपत्तीग्रस्थाना धान्याची आणि चादर बेडशीट टॉवेल मेणबत्ती माचीस चे किट सुमारे 500 घेण्यात आलेली आहे सदर किट चे वाटप दापोली मंडणगड येथे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांचे माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे या सर्व सैनिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com