दापोली मंडणगड तालुक्यात नुकसानग्रस्त भागात अजूनही शासकीय यंत्रणा पोहोचलेली नाही, सरकारचे अस्तित्व दिसत नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप

0
137

नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली व मंडणगड तालुक्याचे मोठे नुकसान झालेले असताना शासनाने दिलेली मदत तुटपुंजी आहे. अनेक गावात शासकीय यंत्रणा न पोहोचल्याने या परिसरात सरकारचे अस्तित्वच दिसत नसल्याचा घणाघाती आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दापोली-केळशी येथे बोलताना केला. फणडवीस यांनी आज मंडणगड दापोली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, की चक्रीवादळामुळे या भागातील लोकांचे आयुष्य उदध्वस्त झाले आहे. या लोकांना सरकारने भरघोस मदत करणे गरजेचे असताना तुटपुंजी मदत करण्यात आली आहे. अनेक गावात पिण्याचे पाणी नाही, अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा नाही, मोबाईल कनेक्टीव्हीटी नाही. विद्युत पुरवठा अजून १५ दिवस होणार नाही असे सांगण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने लोकांनी या आपत्तीच्या काळात घरे कधी उभारायची असा सवालही त्यांनी केला.
सरकारने अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांची ही मदत तुटपुंजी आहे. ज्यांच्या बागा नष्ट झाल्या आहेत त्यांच्या पदरात नेमके काय पडणार? यासाठी प्रतीझाड मदत मिळणे गरजेचे आहे. आपण भाजपच्यावतीने या बाबी सरकारकडे मांडणार आहोत. शिवसेनेने संकटाच्यावेळी कोकणच्या जनतेला वार्‍यावर सोडले तरी भाजपा कोकणातील माणसाला शेवटपर्यंत मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड, माजी खा. निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनय नातू, केदार साठे, भाऊ इदाते, मकरंद म्हादलेकर आदी उपस्थित होते.

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here