चेंबूरचे माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी केली २५०० कलाकारांना मदत
मुंबई (प्रविण रसाळ) ः चेंबूरचे माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी कोरोना काळात लॉकडावूनमध्ये अनेक कलाकारांना धान्याचे कीट वाटून मोठी मदत केली. चेंबुरचे माजी नगरसेवक रमेश कांबळे हे राजकारणासह समाजकार्यातही आघाडीवर आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. कोरोनाच्या काळात लॉकडावून झाल्यामुळे रोजंदारीवर घर चालवणार्या हाडांच्या कलाकारांवर मोठी बिकट वेळ आली होती. त्यांच्या मदतीला रमेश कांबळे धावले. त्यांनी रोजंदारीवर घर चालवणार्या कलाकारांना सढळहस्ते मदत करत दीड महिना पुरेल इतक्या प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचे राशनचे वाटप केले. त्यामध्ये गव्हाचे, तांदळाचे पीठ, साखर, डाळ, तेल, मसाला आदींचा समावेश होता. कांबळे यांनी महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, सोलापूर, नगर, पुणे, औरंगाबाद अशा कानाकोपर्यात असलेल्या गरजू कलाकारांसाठी स्वतः नियमांचे पालन करून वाटप केले. आतापर्यंत त्यांनी २५०० गरीब कलाकार, वादक, नकलाकार, जादूगर, नाटककार, सिनेवर्कर यांना घरपोच राशन कीट दिले. त्यांच्या या कार्याबद्दल कलावंतांनी आभार मानले. कांबळे यांनी केलेल्या मदतीमुळे काहीजण गहीवरून गेले. कांबळे हे एकीकडे गरजूंना मदत करत असताना दुसरीकडे जंतुनाशक फवारणी, मोफत मास्क वाटप, फूड पॅकेट वाटप आदींचेही काम त्यांनी समाजकार्य म्हणून सुरूच ठेवले आहे. समाजासाठी आपल्याला काहीतरी केले पाहिजे या भावनेतूनच आपण काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com