चिपळूण एस.टी. विभाग प्रासंगिक करार तत्वावर एस.टी. गाड्या देणार
सध्या एस.टी.ची जिल्हांतर्गत सेवा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी लॉकडावूनमध्ये अनेक दिवस एसटी वाहतूक बंद असल्यामुळे त्याचे मोठे नुकसान एसटी महामंडळाला सोसावे लागत आहे. सध्या जिल्हांतर्गत बससेवा सुरू असली तरी त्यातील प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता चिपळूण आगारातून जिल्ह्याच्या बाहेर किंवा महाराष्ट्रात कुठेही प्रवास करण्यासाठी प्रासंगिक करार तत्वावर गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती चिपळूण आगार प्रमुखांनी दिली आहे.
www.konkantoday.com