मुंबई महापालिकेतील विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांच मृत्यू
मुंबई महापालिकेतील विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे. शिरीष दीक्षित यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिरीष दीक्षित यांचा माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचं निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे ५५ वर्षीय शिरीष दीक्षित हे सोमवारपर्यंत कामावर हजर होते अशी माहिती मिळत आहे. त्यांचा मृतदेह सायन रूग्णालयात नेण्यात आला असून मृत्यूचे कारण शोधले जात आहे.
www.konkantoday.com