तर १५ जूनपासून राज्यातील सर्व सलून व्यवसायिक शासन परवानगीशिवाय स्वतःच दुकाने सुरू करणार
राज्यातील सलून व्यवसायास २१ मे रोजी सुरू करण्यास दिलेली परवानगी ३१ मे रोजी सुधारित आदेश काढून रद्द केल्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने नियमावली आखून देत सलून व्यवसायास परवानगी रितसर परवानगी द्यावी, म्हणून १० जूनला राज्यातील सर्व सलूनबाहेर निषेधाचे फलक लावण्यात येणार आहेत. त्यानंतरही सरकारने रितसर परवानगी दिली नाही, तर १५ जूनपासून राज्यातील सर्व सलून व्यवसायिक शासन परवानगीशिवाय स्वतःच दुकाने सुरू करतील, असा इशाराही महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी दिला आहे.
दत्तात्रय अनारसे यांनी सांगितले की, लॉक डाऊन काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून १९ मार्चपासून २१ मेपर्यंत राज्यातील सर्व नाभिक समाज आणि सलून व्यवसायिकांना शासनाला संपूर्ण सहकार्य केले हाेते
www.konkantoday.com