संगमेश्‍वर तालुक्यातील कळंबस्ते -उंबरे रस्त्याचे काम अद्यापही अपुरे

संगमेश्‍वर तालुक्यातील कळंबस्ते-उंबरे रस्त्याचे व गाडवी नदीच्या पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. बांधकामासाठी लागणार्‍या खडीचा ढीग पुलाच्याजवळ टाकण्यात आला आहे. यामुळे या भागातून वाहतूक करणे शक्य होत नाही. हे काम अपुरे राहिल्याने असलेला पर्यायी मार्ग पूर्णपणे खचून गेलेला आहे. इथल्या स्थानिकांना एक कि.मी. अंतर जाण्यासाठी पाच कि.मी.चा फेरा पडत आहे. या अर्धवट कामामुळे लोकांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button