कर्नाटकात महाराष्ट्रातून येणार्यांना २१ दिवस क्वारंटाईन सक्तीचे
कर्नाटक राज्यातील कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रसार रोखण्यासाठी इतर राज्यातून कर्नाटकात येणार्या लोकांसाठी कर्नाटक शासनाने नवी नियमावली जाहीर केली. महाराष्ट्रातून येणार्यांना २१ दिवस क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. त्यात पहिले सात दिवस सरकारी क्वारंटाईन असेल. इतर राज्यातूून येणार्यांना मात्र १४दिवसांसाठी होम क्वारंटाईन असणार आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्यांसाठी ७ दिवस इन्स्टीट्यूशनल (सरकारी) तर १४ दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. भंग केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com