
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याला दिल्या दोन मोठ्या गुड न्यूज
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळावारी महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ७० हजारांच्या घरात पोहचली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण देखील वाढत असलं तरी शासन आणि प्रशासनाच्या उपाययोजांना यश मिळत असल्याचं दिसत आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याला दोन मोठ्या गुड न्यूज दिल्या आहेत.
राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ % एवढे झाले आहे.गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. प्रत्येक दिवशी जवळपास ७००ते ८०० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहे.आतापर्यंत जवळपास ३०,१०८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी ११वरून १७.५ % दिवसांवर गेला आहे. याचाच अर्थ नव्याने नोंद होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे. प्रथमत: मुंबई, पुणे, ठाणे औरंगाबाद, नाशिक, नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा कहर पाहायला मिळाला. मात्र मुंबई सोडता नव्याने नोंद होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील आता कमी व्हायला सुरूवात झाली आहे.
www.konkantoday.com