
बनावट ई पास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार — पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग- जिल्ह्यात येण्यासाठी बनावट ई पास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबईहून आलेले चाकरमानी बाजारामधून फिरताना दिसत आहेत. याविषयावर श्री. सामंत म्हणाले, “”मी जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत सूचना दिल्या असून विनाकारण बाजारात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे हातावर शिक्के असलेले फिरताना दिसल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना देणार आहोत. बनावट पासने जिल्ह्यात लोक येत आहेत हे खरे आहे; मात्र त्यांच्यावर काय कारवाई करणे याबाबत आपण मान्सून पूर्व बैठक घेणार आहोत; मात्र असे बनावट पास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असून येत्या दोन ते तीन दिवसात आपल्याला हे पाहायला मिळेल.असेही त्यानी सांगितले
www.konkantoday.com