अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी
एसटी महामंडळाचे चाक तोट्याच्या खड्यात रुतले आहे. अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे, असे प्रतिपादन एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले
राज्य सरकारने १८ मे रोजी काढलेल्या आद्यादेशानुसार एसटी महामंडळ आपल्या बसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्यकता असल्यास जुन्या एसटी बसमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत करून त्याद्वारे ही मालवाहतूक करण्यात येणार आहे. सध्या एसटीकडे स्वतःची ३०० मालवाहू वाहने उपलब्ध आहेत. त्याद्वारे मालवाहतूक सुरु करण्यात आली असून त्याचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून झाला, असे, परब म्हणाले.सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केले आहे. त्यांच्यामार्फत एम. आय. डी. सी. कारखानदार, लघुद्योजक, कृषिजन्य व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये राज्य सरकारचे अनेक महामंडळे, व्यापार मंडळे आपला माल एसटीच्या मालवाहतुकीमधून पाठविण्यास तयार आहेत.
www.konkantoday.com