काेराेना रुग्णाच्या अंत्यसंस्कारावरुन पुन्हा वाद?
आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातील देवूड येथील काेराेना रुग्ण शासकीय रुग्णालयात मयत झाला असून त्या मृतदेहाच्या अंत्यंसंस्कारावरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे.स्थानिक नगरसेवक व शहरातील लोक प्रतिनिधीनी मृत देह रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील स्म्शान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यास ठाम विरोध आहे
यावरून तो मृत देह सकाळ पासून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पडून आहे.कोरोनाच्या मयत व्यक्ती वरून त्याचे दहन कुठे करायचे या वरून प्रत्येक वेळी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये वाद सुरु असतात निदान आता तरी जिल्हाधिकारी यांनी कडक भूमिका घ्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.
www.konkantoday.com