बिबट्याचा महिलेवर हल्ला बावनदी येथील शेल्टी वाडी तील घटना दरम्यान गावातील लोक भयभीत
बावनदी येथील शेल्टी वाडी येथे भर दिवसा बिबट्या चा महिलेवर हल्ला तीन जण तिला वाचवायला गेले तर त्याच्यावर ही हल्ला एक जण काजू च्या झाडावर चढला तर म्हणून बिबटया ही त्याच्या बरोबर समोर दुसऱ्या काजू च्या झाडावर चढून बसला आहे.येथील जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या जखमी महिलेला उपचारासाठी हलवले आहे आणि स्वतः ते आता घटनस्थळी दाखल झाले आहेत त्यांनी तात्काळ वन विभागाला फोन करून बिबटया ला पकडण्यासाठी पिंजऱ्या ची मागणी केली आहे