
कोकणनगर पोलिस चौकीजवळ दाेन गटात हाणामारी,२५ संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कोकणनगर पोलिस चौकीजवळ दाेन गटात हाणामारीचा प्रकार घडला सार्वजनिक ठिकाणी गैरकायदा जमाव करून शांतता भंग करत तलवार, काठी, लोखंडी शिगेचा वापर करत आपआपसांत मारहाण केल्याप्रकरणी २५ संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवार रात्री कोकणनगर पोलिस चौकीजवळ घडली. यातील पाच जणांना गुरुवारी अटक करण्यात आली.
इलियाज शेख , सुफियान नागलेकर , उबेद होडेकर , सहिद खान , आकिब काझी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. इतर २० जण फरार आहेत.
www.konkantoday.com
