वाशिष्ठीतील गाळ काढण्याच्या कामाचा आ. निकम यांच्या हस्ते शुभारंभ


चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचा विषय चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चेला आला होता. आमदार शेखर निकम यांनी याबाबत पाठपुरावा केला व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या. नदीतील गाळ काढण्याचे काम नगरपरिषद व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार असून आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व नगरसेवक आशिष खातू यांनी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत गाळ काढण्याबाबत आमदार शेखर निकम यांना सुचविले होते. त्यानुसार हे काम मार्गी लागले आहे. आज आमदार शेखर निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डाॅ. वैभव विधाते, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक आदी उपस्थित हाेते
www.konkantoday.com

Buy products from Amazon

SYSKA HT3333K Corded & Cordless Stainless Steel Blade Grooming Trimmer with 60 Minutes Working Time; 10 Length Settings (Black)

Price – 1,499/- only click on below image to buy product

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button