
सरकारला थेट गरीबांच्या खात्यात रक्कम टाकण्याची आवश्यकता अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी
करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्यानं अनेकांना त्याचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे हातावर पोट असलेल्यांना मोठ्या प्रमाणात या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारला थेट गरीबांच्या खात्यात रक्कम टाकण्याची आवश्यकता असल्याचं मत अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी इस्टर डुफ्लो या जयपूरमधील ऑनलाइन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. “करोनाच्या संकटकाळादरम्यान सरकारला प्रत्येक भारतीयाला किमान १ हजार रुपये त्वरित दिले पाहिजे. तसंच पुढील काही महिने सरकारनं ही रक्कम भारतीयांना दिली पाहिजे,” असं मत त्यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
www.konkantoday.com