
लाॅकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर हैदराबाद विमानसेवा सुरू ,रत्नागिरीत तीन प्रवासी आले
दोन महिने लॉकडाऊनमध्ये अडकलेली कोल्हापूरची विमानसेवा सोमवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी अलायन्स एअर कंपनीच्या विमानातून हैदराबादवरून १४ प्रवासी आले, तर कोल्हापूरहून १८प्रवासी हैदराबादला रवाना झाले. आलेल्या १४ प्रवाशांची प्राथमिक माहिती घेऊन त्यातील ११ प्रवाशांना डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईनसाठी पाठवण्यात आले, तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन प्रवाशांना रत्नागिरीला पाठवण्यात आले.
www.konkantoday.com