रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७५ वर पोहचली, आज जिल्ह्यात १४ नवे करोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठवण्यात आलेल्या संशयित कोरोना रुग्णांचे १७ अहवाल प्राप्त झाले आहेत.या अहवालांपैकी १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर ३ रुग्णांचे आहवाल निगेटिव आले आहेत.पॉझिटिव आलेल्या रुग्णांमध्ये ६ रुग्णांना कामथे येथे क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे.तर राजापूर येथील क्वारंटाइन केलेल्या ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान दापोली येथील १ तर संगमेश्वर येथील ३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण करून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७५ झाली आहे.तर एकूण अॅक्टिव रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.तर ५ जण मृत्युमुखी पडले आहेत.तर ६७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्याना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
www.konkantoday.com