जिल्हा रूग्णालयात पुढील १५ दिवसांमध्ये करोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार
रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथील करोना लॅब उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता जिल्हा रूग्णालयात पुढील १५ दिवसांमध्ये करोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार आहे. याकरता १कोटी ७ लाखांचा खर्चाचा कोविड फंड अंतंर्गत मंजुरी देखील देण्यात आली आहे.
कोकणात एकही लॅब नसल्याने विरोधकांकडून टीका सातत्याने होत होती. पण, यावर पत्रव्यवहार सुरू असून लवकरच त्याबाबतची मंजुरी मिळेल असे आश्वासन स्थानिक आमदार उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडू मिळत होते.शिवाय, या लॅब संदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या साऱ्या घडामोडी असल्या तरी त्याचे फलित म्हणजे रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात आता करोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार आहे. पुढील १५ दिवसांत हे काम पूर्णत्वाला जाईल,असे सांगण्यात येत आहे.
www.konkantoday.com