
केंद्र सरकार आणि भाजपा राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असा प्रयत्न करत आहे –खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपा राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांना यश मिळणार नाही असंही ते म्हणाले आहेत. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहेत. लोकांचे प्राण वाचावेत, यासाठी ठाकरे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व भाजपा खासदार नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपालांकडे केली.
नारायण राणे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “राणे कोण आहेत ?असा निर्णय घेण्याची मागणी करण्याचा कोणता अधिकार त्यांच्याकडे आहे ?असाही सवाल त्यानी विचारला आहे
www.konkantoday.com