दापोलीत दस्त नोंदणी कार्यालयातील वरिष्ठांना होम क्वारंटाईन केल्याने कार्यालय बंद

0
160

जिल्हयातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची दस्त नोंदणी कार्यालये सुरू झाली असली तरी दापोलीत व कल्याणहून आलेल्या दस्त नोंदणी कार्यालयातील वरिष्ठांना प्रशासनाने होम क्वारंटाईन केल्याने दापोलीतील दस्त नोंदणी कार्यालय बंद झाले असून या अधिकाऱ्यांचे जेथे वास्तव्य होते तेथेही त्यांना राहण्यास विरोध झाल्याने ते पुन्हा कल्याण येथे गेले असून दापोतील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कामकाज केव्हा सुरू होणार असा सवाल विचारला जात आहे.
शासनाला मोठा महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग अशी या विभागाची ओळख आहे. याचे कार्यालय दापोली तहसिल कार्यालयाच्या आवारातच आहे. येथील अधिकारी सूर्यवंशी हे कल्याण येथे राहतात. सदर कार्यालय सुरू करण्याचा शासनाचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी लगोलग दापोली गाठून ते कामावर रूजू झाले. मात्र ते कामावर रूजू झाल्यानंतर ते रेड झोन मधून आले असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. प्रशासनाने त्यांना ताबडतोब बोलावून त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले.
त्यांनी देखील प्रशासनाचा आदेश शिरसावंद्य मानून कार्यालय बंद करून थेट घरी जाऊन होम क्वारंटाईन होणे पसंत केले. मात्र त्यांचे वास्तव्य दापोलीत ज्या ठिकाणी होते तेथे त्यांना राहण्यास विरोध झाल्याने ते पुन्हा कल्याण येथे गेले आहेत. कल्याण येथून पुन्हा ते दापोलीत येत्या दोन दिवसात येणार असले तरी नियमाप्रमाणे त्यांना पुन्हा क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने दापोलीतील मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here