
नांदेड येथे मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या
नांदेड नागठाणा बु.(ता. उमरी) येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये खळबळ उडाली असून, आरोपीला ताब्यात घेत नाही तोपर्यंत महाराजांचा मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका भाविकांनी घेतली आहे.
नागठाणा येथे राज्य मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज रहात होते. या मठामध्ये शिष्यगणही मोठ्या प्रमाणावर राहतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. त्यामुळे प्रत्येकजणच स्वतःची काळजी घेत घरामध्येच रहात आहे. या संधीचा फायदा घेत अनेक खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत.रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला.
www.konkantoday.com