राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा बाबत निश्चित निर्णय होणे आवश्यक – रत्नागिरी भाजपा युवा मोर्चा

0
32

कोरोना संकटामुळे अनेक परिक्षा रद्द झाल्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत संदिग्धता आहे. परिक्षा कधी होणार?होणार की नाही ? याबाबत विद्यार्थी साशंक आहेत. या साशंकतेचा अस्थैर्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर म्हणजे एकप्रकारे करियरवर होणार आहे. संबधित यंत्रणेने विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ न करता विद्यार्थ्यांच्या भवितंव्याचा सर्वकष विचार करून परिक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे ज्यामुळे अस्थैर्य संपून विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.विद्यापीठे परिक्षा घ्यायला तयार आहेत असे वाचनात येते. तरी राज्यशासनाचा नेमका विचार काय ? याबाबत गोंधळ आहे. राज्यपाल महोदयांनी लक्ष घालत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची वृत्ते आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून परिक्षा घेणे आणि आपापल्या मेरीट नुसार विद्यार्थ्यांना स्पर्ध्रेची पूर्ण संधी मिळणे हेच योग्य ठरेल. अन्यथा परिक्षा न देता पासिंग सर्टिफिकेट पुढील स्पर्धात्मक जगतात मोठा अडसर होऊन बसेल.बहुतेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या व अन्य परिक्षा घेण्याचे ठरवले आहे.महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचा लोकप्रिय निर्णय घेण्याचा अट्टाहास असावा असे चित्र दिसते. परिक्षा रद्द करून लोकप्रिय होता येईल पण भविष्यात विद्यार्थ्याचे होणारे नुकसान फार मोठे असेल याची जाणीव ठेवत अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत संदिग्धता संपवून परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री विक्रम जैन व सरचिटणीस श्री.प्रवीण देसाई यांनी केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here