राज्यपालांशी बोलून त्यांचा गैरसमज दूर करू. माझं मत युजीसीकडे मांडणं हा गुन्हा आहे, असं मला वाटत नाही — ना. उदय सामंत

0
29

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला लिहिलेल्या पत्रावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चांगलेच संतापले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंत्र्यांना नको तिथे लुडबूड करण्यापासून रोखा असं सांगितलं. यानंतर आता या वादावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांशी बोलून त्यांचा गैरसमज दूर करू. माझं मत युजीसीकडे मांडणं हा गुन्हा आहे, असं मला वाटत नाही, असं उदय सामंत म्हणालले आहेत.
‘विद्यार्थ्यांच्या मनातलं मी पत्रामध्ये लिहिलं आहे. युजीसीला लिहिलेलं पत्र हे माझं मत आहे. राज्यातली कोरोनाची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच पत्र लिहिलं.कोव्हिडची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची मानसिकता मी याबाबतचं माझं मत मी पत्रात मांडलं,’ असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.
राज्यपालांना विश्वासात न घेता काहीही केलेलं नाही. मागच्या परीक्षा रद्द झाल्या तेव्हाही राज्यपालांशी चर्चा केली होती, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसंच कोणताही निर्णय घेत असताना विद्यार्थ्याचं शैक्षणिक आणि भविष्यात नोकरी किंवा व्यवसायासाठी नुकसान होऊ नये, हे पाहूनचं निर्णय घेतला जाईल, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here