सिंधुदुर्ग जिल्हा बँक, अधिकारी-कर्मचारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी ५८ लाख निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला

0
52

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना शासनाला आर्थिक कमतरता भासू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, अधिकारी-कर्मचारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी ५८ लाख ९ हजार ६०० रुपयांचा निधी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे.
याचा धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. हा निधी देऊन सहकार क्षेत्र सरकारच्या मागे असल्याचे दाखविण्याची किमया जिल्हा बँकेने केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here