सध्या जिल्हयात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२५ झाली

0
32

मिरज येथून काल प्राप्त अहवालामध्ये आलेले नाव कामथे येथील एका रुग्णाचे दाखविले होते तथापि कामथे येथून येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयास वेगळेच नाव पाठविण्यात आले होते. त्यामुळे आडनाव भिन्नतेचा प्रश्न आला. यावर कामथे रुग्णालयातून माहिती पाठविताना दोन्हीकडे वेगळी आडनावे पाठविली असल्याचे मान्य करण्यात आले. सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र आडनावातील गोंधळामुळे काल जाहीर आकडेवारीत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्येत त्याचा समावेश करण्यात आला नाही. हा समावेश याबाबतची माहिती घेतल्याने आज करण्यात आला त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या या घडीस १२५ दाखविण्यात आली असल्याचा खुलासा जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here