नारायण राणेंच्या पडवे मेडिकल कॉलेजमध्ये कोविड 19 तपासणीची लॅब अथवा इतर यंत्रणा नाही–पालकमंत्री उदय सामंत

0
38

नारायण राणेंच्या पडवे मेडिकलमध्ये क्‍लिनिक आहे. तिथे कोविड 19 तपासणीची लॅब अथवा इतर यंत्रणा नाही. त्यामुळे तिथे स्वॅब नमुने टेस्ट करण्याचा विषयच येत नाही, असा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केला. सामंत म्हणाले, “”राणेंच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोविड 19 टेस्टच्या मुद्द्यावर सध्या राजकारण सुरू आहे.मात्र, अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या टीमने या मेडिकल कॉलेजची नुकतीच पाहणी केली. या वेळी कोविड 19 स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी लागणारे आरटीपीसीआर हे मशीन आणि त्याअनुषंगाने लागणारे साहित्यच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
याशिवाय लॅब सुरू करण्याच्या अनुषंगाने इतरही त्रुटी आढळल्या. त्या सर्व बाबींचा विचार करता राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोविड 19 स्वॅब नमुने तपासताच येत नाहीत
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here