
दापोली अर्बन व दापोली नागरी पतसंस्थेच्या वतीने पोलिसांना डिजिटल थर्मामिटरची भेट
सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या दापोली अर्बन बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून दापोली पोलीस ठाण्याला एक डिजिटल थर्मामिटर भेट दिला असून दापोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दापोली पोलिसांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
सध्या दापोली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हजारो चाकरमानी दापोलीत येत असल्याने दापोलीतील पोलीस तणावाखाली आहेत. बंदोबस्त करताना, वाहनचालकांकडून माहिती घेताना त्यांना स्वतःची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी दापोली अर्बन बँकेच्या वतीने दापोली पोलिसांना त्यांचे शरीरातील तापमान मोजण्यासाठी डिजिटल थर्मामिटर दापोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तर पोलिसांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गोळ्याही देण्यात आल्या.
यावेळी दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री.जयवंत जालगावकर, संचालक व सीए श्री.संदीप खोचरे, नगरसेवक श्री.सचिन जाधव, दापोली नागरी पतसंस्थेचे संचालक श्री.निलेश जालगावकर आदी उपस्थित होते. दापोली पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र पाटील यांनी यांनी दोन्ही आर्थिक संस्थांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com