डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल भाजपला शिवसेनेचा टाेला

0
30

राज्यात कोरोनाचे संकट अधिकाधिक गहिरे होत असतानाचा महाराष्ट्र भाजपाने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे, महाराष्ट्र बचाव आंदोलनांतर्गत भाजपाचे नेते आज कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील सरकारचा निषेध नोंदवणार आहेत. मात्र भाजपाच्या या आंदोलनावर शिवसेनेने घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्र प्रकारशमान, तेजस्वी करण्यासाठी युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे.मात्र डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. पाटील-फडणवीसांनी भान राखून बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, मात्र विरोधकांत शहाणपण उरले आहे काय? असा सवालही सामन्यामधून उपस्थित करण्यात आलाय.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here