जिल्हांतर्गत एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय, रत्नागिरी आगारातून प्रतिसाद नसल्यामुळे बस सुटल्या नाहीत

0
32

लॉकडाऊन काळात बंद झालेली जिल्हांतर्गत बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला. ही बस वाहतूक करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. एसटीमध्ये असलेल्या एकूण आसन क्षमतेच्या निम्मे प्रवासी अशी संख्या ठरविण्यात आली आहे. तसेच एसटीत बसणार्‍या प्रवाशांनी सॅनिटायझर वापरून तसेच तोंेडाला मास्क लावून प्रवास करायचा आहे. मात्र ही वाहतूक सुरू करताना कमीत कमी २२ प्रवासी असल्यावरच बस सोडण्यात येईल असा फलक रहाटाघर बस स्थानक येथे लावण्यात आला आहे. रत्नागिरीतून दापोली, चिपळूण, राजापूर, नाट्ये, जयगड आदी ठिकाणी बस सुटणार होत्या. परंतु प्रत्यक्षात तेवढे प्रवासी उपलब्ध न झाल्याने या बसेस आज सकाळी तरी सुटू शकल्या नाहीत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here