अम्फान वादळाचा तडाखा बसलेल्या प. बंगालला पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

0
24

अम्फान वादळाचा तडाखा बसलेल्या प. बंगालला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर एका व्हिडिओ मेसेज द्वारे त्यांनी ही मदत जाहीर केली.
या वादळात आणि त्यानंतर झालेल्या धुवाधार पावसाने मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी ५०हजार रुपये देण्याचे जाहीर केले. दरम्यान या भयावह वादळात ७७ जण मरण पावले असल्याचे स्पष्ट झाले.
उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पूर्व आणि पश्‍चिम मिदनापूर, हावडा आणि हुगली जिल्ह्यातही वादळचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here