लॉकडाऊनच्या काळात जप्त केलेल्या दुचाकी मालकांकडून एसटी प्रशासना बेकायदेशीर भाडे वसुलीच्या तक्रारी -वाहन धारकांत नाराजी
रत्नागिरी शहरातील लॉकडाऊनच्या काळात बंदी असून देखील दुचाकी वाहने चालविणार्यांकडून दुचाकी जप्तीची कारवाई पोलिसांनी केली होती. ही जप्त केलेली वाहने वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करून ठेवण्यात आली होती. रत्नागिरी शहरातील पोलीस मुख्यालय व एस.टी.च्या आगारात जप्त केलेल्या नागरिकांच्या दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. पोलीस परेड मैदानातील ठेवण्यात आलेल्या दुचाकी मालकांना कोणतेही शुल्क न घेता दंड भरून सोडून देण्यात आले. मात्र एस.टी. आगारात ठेवलेल्या गाड्यांसाठी चुकीच्या पद्धतीने पार्किंग चार्ज घेतला जात आहे. एका दुचाकी चालकाची जप्त केलेल्या गाडीला ५३ दिवस झाले होते. त्याचे दिवसाला ५० रु. प्रमाणे भाडे आकारून एसटी आगारात ठेवलेल्या दुचाकीचे पार्किंगचे चार्जेस म्हणून ३१०० रु. भरून घेण्यात आले. आधीच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांकडून एसटी महामंडळ बेकायदेशीररित्या पार्कींग वसुली करीत असल्यामुळे नागरिकांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत ना. उदय सामंत व रत्नागिरीचे पालकमंत्री व परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे दाद मागण्यात येणार असल्याचे नगरसेवक सुहेल मुकादम यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com