रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे शतक पार ,आज आणखी १६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या काेराेना रुग्णांनी शतक पार केले आहे.आज मिरजहुन आलेल्या अहवालामध्ये तब्बल १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १०८ झाली आहे.
आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीमध्ये ६ , संगमेश्वरमध्ये ६,गुहागरमध्ये ४ असे ऐकून १६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
रत्नागिरीत सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नर्सिंग होस्टेल ४ रुग्ण ,कर्ला १, धामणसे १अशी आहेत. संगमेश्वर तालुक्यात धामापूर २,कोळंबे २,भिंकोर्ड १,कसबा १ अशी आहेत तर गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथील ४ रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालातील सर्व व्यक्ती विलगीकरणा मध्ये होत्या.यातील बहुतेकांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.आज मिरज येथून अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी १६ पॉझेटिव्ह तर ६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता ऐकूण काेराेना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०८ झाली आहे.तर आतापर्यंत ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व ३ जणांचा मृत्यू झाला आहे.अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे.
www.konkantoday.com