
रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार, क्वॉरंटाईन सेंटरमधील काळजी घेणार्यांनाच पीपीई कीट नाही -विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत घडला प्रकार
रत्नागिरी शहरातील दामले हायस्कूल येथे क्वॉरंटाईन सेंटर उघडण्यात आले असून तेथे बाहेरून येणार्या लोकांची तपासणी केली जाते. मात्र त्या ठिकाणी तपासणी करणार्या आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व त्यांच्या सहकार्यांना आढळून आले. याबाबत दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. जे लोकांची काळजी घेत आहेत अशा आरोग्य कर्मचार्यांनाच प्रोटेक्शन कीट नसल्याचे दिसून आले. ही अत्यंत विदारक गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरेकर यांनी आपल्याबरोबर आणलेल्या सुरक्षा कीटचे या आरोग्य कर्मचार्यांना तातडीने वाटप केले.
याबाबत जिल्हा प्रशासनाने आपणाला सर्व आरोग्य कर्मचार्यांना कीट दिले असल्याचे सांगितले होते. परंतु आम्ही येथे आलो असता हा प्रकार आढळून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. निरंजन डावखरे यांच्या गाडीत असलेल्या कीटचे वाटप कर्मचार्यांना देवून थोडासा दिलासा देण्यात आला. जर आरोग्य कर्मचार्यांनाच कीट नसेल ही अत्यंत वाईट अवस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण याबाबत तहसिलदारांना मी सूचना दिल्या असून ते आजच्या आज सर्वत्र कीटचे वाटप करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com