शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून मतदारसंघातील १४ दिव्यांग बांधवांना स्कुटरचे वाटप
कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून मतदारसंघातील १४ दिव्यांग बांधवांना स्कुटरचे वाटप करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.कुडाळ येथील शिवसेना शाखेत गुरूवारी हा स्कुटर वाटप कार्यक्रम पार पडला.समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांना मदत करण्याच्या हेतूने आमदार स्थानिक विकास निधीतून स्कुटर वाटपाचा उपक्रम राबविला आहे.दिव्यांग बांधवांना स्वावलंबी करण्यावर आपण भर देत आहोत. त्यांनी या स्कुटरचा योग्य वापर करावा. यापुढेही दिव्यांग बांधवांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
www.konkantoday.com